ज्ञानविकास विद्यालय भराडी येथे 'आपण करूया महाराष्ट्र रेडी' कार्यशाळा

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता या आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देत त्यांना भविष्यातील डिजिटल युगासाठी सक्षम करण्याच्या उद्देशाने ज्ञानविकास विद्यालय, भराडी येथे आपण करूया महाराष्ट्र रेडी या उपक्रमांतर्गत जनजागृती व मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात आली.

या सदगुरू कार्यक्रमात कॉम्प्युटर्स, तळणीचे संचालक तथा ए.आय. प्रशिक्षक श्री. विशाल सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना ए. आय. म्हणजे काय ? चाट जी.पी.टी. सह इतर आधुनिक ए.आय. टूल्सचा शिक्षणात प्रभावी वापर, अभ्यास अधिक सोपा व गुणवत्तापूर्ण कसा करता येईल, तसेच भविष्यातील करिअरच्या नव्या संधी याविषयी प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी प्रतिसाद देत ए. आय. विषयी विविध प्रश्न विचारून आपली जिज्ञासा व्यक्त केली.

आपण कार्यक्रमादरम्यान करूया महाराष्ट्र एआय रेडी या मोफत ऑनलाइन एआय. प्रशिक्षण उपक्रमाची माहिती देण्यात आली. या उपक्रमामध्ये सहभागी झाल्यास विद्यार्थ्यांना ए. आय. विषयाचे मूलभूत ज्ञान, ए.आय. मास्टर क्लास तसेच डिजिटल प्रमाणपत्र मिळण्याची संधी उपलब्ध असल्याचे आश्वासीत करण्यात आले.

यावेळी सोनवणे यांनी आपण करूया एआय. रेडी या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्यव्यापी उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले. ङ्गङ्घभविष्यात यशस्वी व्हायचे असेल तर एआय हे केवळ तंत्रज्ञान नसून, एक आवश्यक कौशल्य आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने एआय शिकून स्वतःला डिजिटल युगासाठी तयार केले पाहिजे, असे आपल्या मार्गदर्शनात मत व्यक्त केले.

कार्यक्रमास संस्थेचे बकार नरेश, जी. एन. ठोंबरे तसेच इतर सहकारी शिक्षक उपस्थित होते. विद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेत एआय विषयी नवीन ज्ञान आत्मसात केले. या कार्यक्रमासाठी अशोकदादा गरुड शैक्षणिक समूहाच्या मुख्याध्यापक शिक्षक आदींनी परिश्रम केले.